
जळगाव, दि. 3 (जनसंवाद न्युज): अखिल भारतीय मराठा महासंघ, लोक संघर्ष मोर्चा,अखिल भारतीय छावा संघटना, राजे प्रतिष्ठान यांनी 3/10/2024 रोजी जिल्हाधिकारी यांना ” हैद्राबाद गॅझेट” लागू करण्यात यावे, यामागणीचे निवेदन देण्यात आले.

मनोज जरांगे पाटिल यांचे मराठा आंदोलन चालू असताना सरकारने 11 सदस्य समिती गठित करून त्यांना तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथून पाठवून “हैद्राबाद गॅझेट”चे साक्षांकित प्रत आणून ते सरकार जमा केले. त्या गॅझेट नुसार मराठवाडातील मराठा हा कुणबी च आहे असे सिद्ध होत आहे , सदर गॅझेट हे 10 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावे ही मागणी यावेळी करण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र मराठे , लोक संघर्ष मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय पाटील , अखिल भारतीय छावा संघटना IT जिल्हाध्यक्ष केतन पाटील , राजे प्रतिष्ठान जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील , लोक संघर्ष मोर्चा जिल्हा प्रमुख जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवम पाटिल ,भरत पाटील , किरण पाटील , पराग घोरपडे आदी उपस्थित होते.