
जळगाव, दि. 18 (जनसंवाद न्युज): धानवड येथील जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षिका सरिता विजय पाटील यांनी रस्त्यावर सापडलेली दोन लाख रूपये किमतीची सोन्याची मंगलपोत परत करून आदर्श निर्माण केला आहे.
जळगाव येथील वैशाली वाल्हे व त्यांचे पती देविदास वाल्हे हे रोज फिरायला जातात. गुरूवारी फिरत असताना दोन लाख रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची मंगल पोत रस्त्याने पडली. घरी आल्यावर त्यांच्या ते लक्षात आले. ईश्वर काॅलनीतील रहिवासी व धानवड येथील जि.प. शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सरिता विजय पाटील या परीसरातील गृहिणी रुपाली मनोज पाटील, प्रतिभा कैलास चौधरी, श्रद्धा पुष्पराज ढाके याच्यासोबत फिरायला गेले असता त्यांना ती मंगलपोत सापडली. त्यावर R.C चा शिक्का बघितल्याने पोत सोन्याची असल्याचे त्यांना कळले. घरी जाऊन त्यांनी घरच्यायांशी चर्चा केली असता ज्यांची पोत आहे त्यांना परत करण्याचे ठरवले.
दुसर्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेले असता रस्त्यात देविदास वाल्हे आणि सरिता विजय पाटील यांची भेट झाली. परिचित असल्याने सुख दुःख विषयी चर्चा केली, चर्चेमध्ये देविदास वाल्हे यांनी त्यांच्या पत्नी विषयी सांगीतले की पत्नी वैशालीला रात्री झोपच लागली नाही. कारण दोन तोळ्याची सोन्याची पोत हरवल्याचे त्यांनी सांगीतले, त्यावर सरिता विजय पाटील म्हणाल्या की सर काही काळजी करू नका ती मंगलपोत माझ्याकडे सुरक्षित आहे. तुम्ही घरी या आणि मंगलपोत घेऊन जा.
त्या प्रमाणे वैशाली वाल्हे व देविदास वाल्हे यांनी सरिता पाटील यांच्या घरी जाऊन हरवलेली दोन तोळ्याची पोत ताब्यात घेतली आणि माजी केंद्र प्रमुख प्रभाकर पाटील आणि सर्व कुटुंबाचे ऋण व्यक्त करून आभार मानले. समाजामध्ये ईमानदारी अजुनही शिल्लक असल्याचा प्रत्यय आला. शिक्षिका सरिता पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.