
जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात व विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्याच्या जल्लोषांमध्ये श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या उपशिक्षिका साधना शिरसाट यांनी श्री गणेशाची आरती केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी नृत्य करून नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात देखील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यानंतर संपूर्ण शाळेच्या परिसरा मधून मिरवणूक काढल्यानंतर अखेर श्री संत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना इयत्ता नववीच्या मुलींच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते.