जळगावसामाजिक

परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जळगाव, दि.17 (जनसंवाद न्युज): परभणी येथे झालेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील आंबेडकर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले.
परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परभणी येथे संविधान प्रेमी नागरिकांनी सनदशीर मार्गाने केलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा संतापजनक प्रकार पोलीस विभागाने केला होता. परभणी शहरात कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक निरपराध तरुणांची धरपकड करून त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत विधी शाखेचा विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत.


जळगाव शहरात मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील संविधान प्रेमी विविध संघटना व समाज बांधवांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून संविधान विटंबना घटनेचा निषेध व्यक्त करत महायुती शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
“महायुती शासनाचा धिक्कार असो” “सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी मारेकारी पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात सतीश गायकवाड, विजय सुरवाडे, आशिष सपकाळे, गणेश पगारे, अजय गरुड, नितीन अहिरे,दिलीप अहिरे, अजय गरुड, डीगंबर सुरवाडे, मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, भारत ससाणे, मिलिंद सोनवणे, आशिष सपकाळे, ॲड. अभिजीत रंधे, हरिश्चंद्र सोनवणे, शांताराम अहिरे, सुरेश सोनवणे, मनोज अडकमोल, भारती रंधे, क्रांती पवार, संजना मोरे, भाग्यश्री सुरवाडे, छाया सोनवणे, राहुल सावळे, अक्षय मेघे, तुषार तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button