दाणाबाजारातील भवानी मंदिरात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सपत्नीक आरती
जळगावकरांची इच्छा पूर्ण करण्याचे घातले साकडे

जळगाव, दि. 4 (जनसंवाद न्युज): शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे महाआरती करून देवी मातेला साकडे घातले. जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर. त्यांना कायम सुखी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना आ. भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी केली.

देशात सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. जळ6गावात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आ. राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच महाआरती करून जळगावकरांसाठी प्रार्थना केली. प्रसंगी मंदिरातील विश्वस्तांनी आमदार भोळे यांचे सपत्नीक स्वागत केले.
यावेळी भाविकांशी आमदार राजूमामा भोळे यांनी संवाद साधला. राजू बांगर, राजेंद्र वर्मा, गुरुजी महेश कुमार त्रिपाठी, लक्ष्मी कुमार त्रिपाठी, विनोद रतावा, किसनलालजी पुरोहित, संजय व्यास, परेश जगताप आदी या वेळेला उपस्थित होते.