सामाजिकजळगावताज्या बातम्या
उद्या टुरिंग टॉकीज उपक्रमात राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘आवारा’

जळगाव, दि. 22 (जनसंवाद न्युज): अजिंठा फिल्म सोसायटी तर्फे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी टुरिंग टॉकीज उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान येथील एम्फिथिएटर येथे या महिन्याच्या टुरिंग टॉकीजमध्ये रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहाला शोमॅन राज कपूर यांचा गाजलेला ‘आवारा’ हा चित्रपट दाखविला जाईल. चित्रपट आस्वादासोबतच चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, सिनेमेटोग्राफी यासंदर्भात खुली चर्चा देखील होणार आहे. रसिकांनी उपक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अशोक जैन, अनिल भोळे, विनीत जोशी, डॉ. संजय हांडे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, किरण सोहळे, सुचित्रा लोंढे यांनी केले आहे.