डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला स्टीलचा जिना व बंद पडलेले कारंजे बसवण्यात यावे, सार्वजनिक उत्सव समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव, दि. 6 (जनसंवाद न्युज): जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की जळगाव रेल्वे स्टेशन जवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असून त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेस पुष्पहार घालताना क्रेनच्या साह्याने वर चढुन हार घालण्यात येतो, त्यावेळेस अपरिचित घटना किंवा महामानवांची अवहेलना पाय लागून होऊ शकते, म्हणून आपणास कळकळीची विनंती आहे की त्या ठिकाणी स्टील चा फोल्डिंग जिना बसवून मिळावा ,तसेच कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा कारंजा बंद आहे व त्या तत्सम प्रकारचे सुशोभीकरण ह्या येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती च्या आत करून मिळावा अशी विनंती समितीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी भारती रंधे, चंद्रमणी मोरे, निलु इंगळे, तृशाल सोनवणे, सचिन सरकटे, संजय बागुल, संगीता किरण मोरे, मिना प्रकाश बोरसे, मुकेश जाधव, विजय सुरवाडे, सतीश गायकवाड, मुकुंद सपकाळे, राजेश भाऊ शिरसाठ, हरिश्चंद्र सोनवणे, मिलिंद सोनवणे, दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते.