“मनातील गाणी, सोनेरी आठवणी” निवेदन मंगला खाडिलकर, सुरेल कार्यक्रमाचे उद्या आयोजन

जळगाव, दि. 5 (जनसंवाद न्युज): खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकूमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात केसीई सोसायटी संचलित कान्ह कला ललित केंद्र आणि शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रम “मनातील गाणी, सोनेरी आठवणी”, निवेदन मंगला खाडीलकर हा सुरेल कार्यक्रम दि.7 रोजी सायंकाळी 6 वाजता, भैय्यासाहेब गंधे सभागृह,लाना शाळा येथे होणार आहे.

यात सहभागी गायक कलावंत कपिल शिंगाणे, अक्षय गजभिये, रितेश भोई, मयुरी हरिमकर, वैशाली शिरसाळे, ईशा वडोदकर, वादक कलावंत – गौरव काळंगे (सिंथेसायझर), राहुल कासार ( तबला),देवेंद्र गुरव ( ऑक्टोपॅड),कु.राजेश्वरी रत्नपारखी ( बासरी) असणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन कान्ह कला ललित केंद्र संचालक शशिकांत वडोदकर, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य अशोक राणे यांनी केले आहे.