
जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): कवयित्री बहिणाबाई चौधरी अत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील बाजूस हनुमंत खोरे आहे. या परिसरातील जंगलात गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. हि आग वाढतच गेली, या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली तर एक कंत्राटी वनकर्मचारी भाजला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लखन मुरलीधर लोकणकर वय-३५, रा. एकलग्न ता. धरणगाव असे भाजलेल्या वनकर्मचाऱ्यांचे नाव आहे. तो झाडाच्या फांद्यांनी आग विझवत असताना त्याचे दोन्ही हात भाजले.
शहरापासूनजवळ असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील बाजूस हनुमंत खोरे परिसरात जंगल आहे. गुरुवारी ६ मार्च रोजी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान जंगलातील गवताला अचानकपणे आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर जंगलातील झाडे जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.
आग विझवण्यासाठी विद्यापीठासह, जैन इरिगेशन कंपनी, महानगरपालिकेचे बंब मागवण्यात आले होते.