जळगावताज्या बातम्यासांस्कृतिक
श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात साकारली एकतेची पतंग

जळगाव, दि. 14 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची एकतेची प्रतीकात्मक पतंग तयार करून तिळगूळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका श्रीमती शितल कोळी यांनी विद्यार्थ्यांना संक्रांती सणाचे महत्त्व सांगून पतंग उडविताना घ्यावयाची काळजी व प्राणीपक्ष्यांना होणारा धोका याविषयी मार्गदर्शन केले. तिसरी ते नववीच्या एकूण ३०० विद्यार्थ्यांनी मिळून एकतेची पतंग विद्यालयाच्या तर्फे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या वतीने शाळेतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना पतंग वाटप करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.