
जळगाव, दि.16 (जनसंवाद न्युज): मागील २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरे करत असते. ज्यात सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास या बाबत प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार असून उत्कृष्ट मिरवणूकीला पुरस्कार देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. रविवारी झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रतिभाताई शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शिवजयंती निमित्त राबविण्यात येणारे उपक्रम
दि. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांची मशाल मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक शिवाजी स्टेडियम येथून सुरु होईल महात्मा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शिवस्मारकावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल. MPL च्या वतीने शिवकालीन वस्तुप्रदर्शन साकारले जाईल. दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शोभायात्रा काढून शिवस्मारकावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. या वर्षी प्रथमच जळगाव शहरातील विविध शिवजयंती साजऱ्या करणाऱ्या मंडळाना सर्वांनी सायंकाळी आपल्या मिरवणुका आपापल्या परिसरातून सुरवात करून खान्देश मॉल येथे पोहचून मग शिवस्मारकावर समारोप करावा असे आवाहन करण्यात आले असून, या मार्गावरील उत्कृष्ठ मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना अनुक्रमे 20000, 15000, 10000 असे प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार असून उत्कृष्ठ सजावट उत्कृष्ठ जिवंत देखावा, उत्कृष्ठ लेझिम पथक, आदर्श व शिस्तबद्ध आयोजन, सामाजिक संदेश अशी पाच प्रत्येकी 5000 ची बक्षिसेही देण्यात येणार आहे.
शिवजयंती सर्व धर्मीय व सर्व जातीय बांधवांनी एकत्रित येऊन शांततेत व एकजुटीने साजरी करावी असे आवाहन
समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीन छावा सिनेमा टॅक्स फ्री करणे, राहुल सोलापुरला अटक करणे असा ठराव बैठकीत करण्यात आला.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अ. कारीम भाई सालार, कार्याध्यक्ष कैलास आप्पा सोनवणे, सचिव राम रवींद्रनाथ पवार, कोशाध्यक्ष सचिन पांडे, उपाध्यक्ष रोहित निकम, लीनाताई पवार, जयश्रीताई महाजन, मुकुंद सपकाळ, निलेश पाटील, विष्णू भंगाळे समिती सदस्य पुरुषोत्तम चौधरी, अजबसिंग पाटील, दीपक सूर्यवंशी, संतोष पाटील, प्रफुल्ल पाटील, खुशाल चव्हाण, योगेश नन्नावरे, अविनाश बाविस्कर, फईम पटेल, साजिद शेख, सत्यजित साळवे, गणी मेमन. समितीचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. डी. डी. बच्छाव सर, श्रीराम पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, जगन्नाथ पाटील, समितीचे समन्वयक सुरेश एल पाटील, सुरेंद्र पाटील, कुलभूषण वीरभान पाटील, किरण बच्छाव, शंभू पाटील, आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.