जळगावउद्योगताज्या बातम्या

जैन इरिगेशन सिस्टिमला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार, केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

जळगाव, ता.20 (जनसंवाद न्युज): जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य मोठे उद्योग श्रेणीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रतिष्ठित ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातवाढीच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जैन इरिगेशनला मिळाला. जागतिक स्तरावर कृषी तंत्रज्ञानात नावीन्य, गुणवत्ता व उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनची वचनबद्धता अधोरेखित करणारा हा पुरस्कार आहे. शाश्वत कृषी उपाय आणि निर्यात उत्कृष्टतेमध्ये कृषी नवोपक्रमांना चालना देण्यासाठी जैन इरिगेशनचे स्थान आणखी मजबूत करणारा हा पुरस्कार म्हणता येईल.
दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे बँकिंग व वित्त विभागाचे उपाध्यक्ष पीयूष कुमट व संजय शर्मा यांनी जैन इरिगेशन कंपनीतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष पंकज चढ्ढा आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button