लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे थेट कर्ज योजना, गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि. 14 ( जनसंवाद न्युज ): साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगाव कार्यालयामार्फत थेट कर्ज योजना, PM-SURAJ तसेच शैक्षणीक कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. दारिद्र रेषेखालील मातंग व समाजातील लोकांचे जिवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उददेशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केलेली आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणा-या 12 पोटजातील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते ज्यात मांग, मातंग , मिनी मादीग , मादींग , दानखणी मांग , मांग महाशी , मदारी , राधेमांग , मांग गारुडी ,मांग गारोडी , मादगी , मादिगा. या जातींचा सामावेश आहे.
यात थेट कर्ज योजनेचे उद्दीष्ट
प्रकल्प -1.00 असुन त्याचे उद्दीष्ट-35 आहे. शैक्षणीक कर्ज योजना देशाअंतर्गत 30.00 लाख. व परदेशाअंतर्गत – 40.00 लाख. योजना सुरु आहे. PM-SURAJ कर्ज योजना- 5.00 लाख ते 50.00 लाख आहे. अर्ज केंद्र शासनाच्या PM-SURAJ या पोर्टलवर Online व्दारे अपलोड करावीत.
योजनेकरिताच्या अटी
याकरिता अर्जदार या जिल्हयाचा रहीवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावा. केंद्रींयमहामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीन/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3,00,000/पेक्षा कमी असावे. अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील पती वा पत्नी या दोघांपैकी एकालाच महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. महामंडळाने वेळोवेळी घालून देलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहातील. लाभार्थ्यांनी अथवा कुटुंबातील व्यक्तीने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे
(कर्ज प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा).अर्जाचा नमुना/शैक्षणीक व इतर कर्ज फॉर्म कार्यालयात मोफत / विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जदाराचा जातीचा दाखला. (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.) अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा.). नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात. शैक्षणिक कर्जा करीता शैक्षणीक पात्रता. रेशनकाडांच्या झेरॉक्सप्रती / आधार कार्ड झेरॉक्स प्रती / मतदान कार्ड / पॅनकार्ड/मोबाईल नंबर. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा उपलब्धतेबाबतचा पुरावा. तसेच घराचा उतारा. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा. उदयोग आधार / शॉकाप लायसन्स, सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा / राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक आधार व पॅनकार्डशी लींक असावे. व्यवसायसंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. व्यवसायासंबधी प्रकल्प अहवाल / खरेदी करावयाच्या मालाचे, कोटेशन (CST/BST) प्रतिज्ञा पत्र (नोटरी / अॅपेडेव्हीट). शैक्षणीक कर्जासाठी उत्पन्न मर्यादा- 300000/- लाख रुपये.
अशा प्रमाणे महामंडळाच्या योजना राबविण्यात येत आहेत, तरी संबधीत होतकरु मातंग समाजातील महीला / पुरुष वर्गानी याचा फायदा घ्यावा असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.