
जळगाव, दि.2 (जनसंवाद न्युज): जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जळगाव यांनी सन २०२४-२५ या वर्षात १२ ऑगस्ट ते १२ ओक्टोम्बर २०२४ intensified कॅम्पेन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत तसेच वर्षभर जिल्ह्यात शासनाद्वारे दिलेला उद्दिष्टपूर्ती विहित वेळेत केल्यामुळे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, जगन्नाथ राव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेतर्फे जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण विभाग यांना डॉक्टर किरण पाटील जिल्हा शल्य चिकित्सक व संजय पहुरकर कार्यक्रम अधिकारी राज्यामध्ये जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीबद्दल याना सन्मानित करण्यात आले.