जळगावसांस्कृतिक
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सप्ताह मध्ये आमदार राजू मामा भोळे यांनी केली पुष्पवृष्टी
जळगाव, दि. 28 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह च्या समाप्तीच्या दिवशी जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते समाधी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा असून, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.३० या वेळेत दिंडी सोहळा होणार आहे. रात्री ८.०० ते ११.०० या वेळेत परंपरेप्रमाणे ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. यावेळेस समस्त ग्रामस्थांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार राजू मामा भोळे यांचा समस्त मेहरूणच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.