
जळगाव, दि.12 (जनसंवाद न्युज): वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टिका केली. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. यांच्यासमोरच महाराव यांनी ही टिका केल्याने जळगावात महायुतीतर्फे ‘शरद पवारजी तुम्ही इतके हिंदू द्वेष्टे का ?’, असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यात आले.
जळगावात गुरुवारी टाळ मृदुंगाच्या तालावर याचा निषेध आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी प्रभू श्रीरामाचे पूजन व आरती करण्यात आली. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये, असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी अध्यात्मिक आघाडी ह. भ. प. भिकन देशमुख भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निषेधाचे फलक हातात घेत शरद पवारजी तुम्ही इतके हिंदू द्वेष्टे का ? असा प्रश्न विचारत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली होती. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते, परंतु, त्यांनी त्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत टाळ मृदुंग आंदोलन केले.
याप्रसंगी सकल हिंदू बांधव अध्यत्मिक आघाडीचे ह .भ. प. भिकण देशमुख यांच्या सोबत भाजप जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे व शिवसेना (शिंदेगट) यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली यावेळी सरिता माळी, कुंदन काळे, गणेश सोनवणे, पिंटू काळे, दीपक सूर्यवंशी, विरण खडके, सरचिटणीस अरविंद देशमुख, सुनील खडके, सीमा भोळे, मंगला बारी, शोभा बारी, शोभा कुलकर्नी सुनील सरोदे, शक्ति महाजन, हर्षल मावळे समस्त पदाधिकारी मंडळाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. टीका केली होती. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते, परंतु, त्यांनी त्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत टाळ मृदुंग आंदोलन केले.
याप्रसंगी सकल हिंदू बांधव अध्यत्मिक आघाडीचे ह .भ. प. भिकण देशमुख यांच्या सोबत भाजप जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे व शिवसेना (शिंदेगट) यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली यावेळी सरिता माळी, कुंदन काळे, गणेश सोनवणे, पिंटू काळे, दीपक सूर्यवंशी, विरण खडके, सरचिटणीस अरविंद देशमुख, सुनील खडके, सीमा भोळे, मंगला बारी, शोभा बारी, शोभा कुलकर्नी सुनील सरोदे, शक्ति महाजन, हर्षल मावळे समस्त पदाधिकारी मंडळाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.