स्वातंत्र्यानंतर जेवढा विकास झाला नसेल, तेवढा शिंदे सरकारच्या कार्यकाळात झाला. – आ. चिमणराव पाटील

पारोळा, दि. 18 (जनसंवाद न्युज): महायुती सरकारच्या यशस्वी कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि नागरिकांशी जोडण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पारोळा येथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पारोळ्यासह जिल्ह्यात केलेल्या प्रगतीची आणि राज्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्वपूर्ण योजनांची यावेळी आ.चिमणराव पाटील यांनी माहिती दिली.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी महायुतीचे रिपोर्ट कार्ड प्रकाशन करण्यात आले. राज्यामध्ये तसेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये महायुतीने केलेल्या कामांच्या लेखाजोखा रिपोर्ट कार्ड मध्ये मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर अडीच वर्षातील महायुती सरकारने केलेज्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी आ. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱी उपस्थित होते.
या रिपोर्ट कार्डचा आज जळगावच्या पारोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांच्या सहपदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन करण्यात आले.