जळगावराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे NHAI च्या अधिकाऱ्यांची आरती उतारून आंदोलन

महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा पुढील आंदोलन अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधुन करण्याचा इशारा

जळगाव दि. 4 (जनसंवाद न्युज): जळगाव शहरातील महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवुन उड्डाण पूल व्हावा यासाठी मागील वर्षी 4 सप्टेंबर 2023 रोजी जळगाव जागर यात्रा काढण्यात आली होती. त्या जागर यात्रेला आज एक वर्ष होऊन सुद्धा जळगाव शहरातील हायवे वरचे खड्डे जसेच्या तसे आहेत, अशा या कुंभकर्ण प्रशासनाचा निषेध आणि या बिनकामी प्रशासनाची आरती ओवाळून निषेध करण्यात आला. NHAI चे अधिकारी शिवाजी पवार यांची अगरबत्ती फुलांसोबत आरती ओवाळण्यात आली.

जळगाव शहरा मधील खोटे नगर ते कालंकी माता मंदिरापर्यंत उड्डाणपूल व्हावे आणि महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावे म्हणून शिवाजी पवार हे जळगाव शहरावर प्रसन्न व्हावे आणि शहरातील महामार्गावरील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे आरती ओवाळू आंदोलन करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्या त्यांच्याकडे मांडण्यात आले .येणाऱ्या काही दिवसातच डांबराने खड्डे बुजवण्यात येतील असे श्री पवार यांच्याकडून सांगण्यात आले. सोबतच जळगाव शहरातील बायपास बांभोरी ते तरसोद रस्ता लवकरात लवकर वाहनांसाठी सुरू करण्यात यावा यासाठीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NHAI च्या अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरले तसेच जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौक इच्छादेवी चौक अजिंठा चौक येथील सर्कल तोडून सिग्नल करण्यात यावे जेणेकरून अपघाताच प्रमाण कमी होऊन जीवित हानी होणार नाही.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे शहराध्यक्ष विनोद शिंदे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले शहर अध्यक्ष किरण तळले जिल्हा संघटक राजेंद्र निकम शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे सचिव जितेंद्र पाटील उपसचिव कुशाल ठाकूर हरिओम सूर्यवंशी पवन सपकाळे राजू डोंगरे दीपक राठोड अशितोष जाधव निहीर सोनार सोनू सोनार साजन पाटील एडवोकेट सागर शिंपी विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील मनसैनिक अनिल दिघे पंकज चौधरी नयन ठाकूर आधी आजी-माजी पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button