हरियाणात भाजपचा विजय
जळगाव जिल्हा व महानगर भाजपतर्फे जी.एम. फाउंडेशन समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगाव, दि. ८ (जनसंवाद न्युज): हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमतासह सलग तिसऱ्यांदा सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ साधल्याने जळगाव जिल्हा व महानगर भाजपतर्फे मंगळवारी कार्यकर्त्यां तर्फे भव्य जल्लोष करण्यात आला. जी. एम. फाउंडेशनसमोर पेढे वाटून व नाचून आनंदोत्सव साजरा केला.

देशात गेल्या आठवड्यात हरियाणा व जम्मू- काश्मिर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी मंगळवारी होऊन हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय संपादन केला. दोन टर्मपासून हरियाणात भाजपची सत्ता होती. या वेळी सत्ताविरोधी वातावरण असल्याचे चित्र होते, एक्झिट पोलही विरोधात गेलेले असताना भाजपने मोठा विजय मिळविल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी. एम. फाउंडेशनसमोर एकत्रित येत हिरयाणा विजयीचा जल्लोष केला. फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून जल्लोष केला. या वेळी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, माजी उपमहापौर सुनील खडके, भगत बालाणी, रेखा कुलकर्णी रेखा वर्मा, मंगला बारी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.