ताज्या बातम्याजळगावराजकीय

संविधान भवन जळगाव उपनगर पिंपराळा हुडको परीसरात व्हावे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनची मागणी

जळगाव, दि. 8 (जनसंवाद न्युज): ‘संविधान भवन’ पिंप्राळा हुडको येथेच व्हावे या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व गौतमी महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे आज निवेदन देण्यात आले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम पुरस्कृत योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये ‘संविधान भवन’ तयार करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून आपल्याकडे आलेला आहे, त्या संदर्भात PMJVK मार्गदर्शक तत्त्वानुसार आम्ही आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की

J

नवरात्रोत्सव, आजचा रंग लाल

‘संविधान भवनासाठी ‘ जळगाव उपनगर पिंपराळा हुडको येथे किमान 7 एकरच्या वरची जागा महानगरपालिकेची असून, अशा प्रकारचा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर सारखी प्रतिकृती ह्या सात एकरच्या जागेत व्हावी अशी मागणी जळगाव शहरातील नागरिकांची कित्येक वर्षापासून आहे, तरी PMJVK मार्गदर्शक तत्त्वानुसार त्या ठिकाणी अल्पसंख्यांक तसेच ,SC/ST/OBC/NT जातीची लोकसंख्या आपल्या निकषानुसार आहेत.

पिंप्राळा हुडको या ठिकाणी हे’ संविधान भवन’ झाल्यास त्याचा उपयोग पिंप्राळातील हुडको परिसरातील खोटे नगर परिसर ,दादावाडी परिसर ,खंडेराव नगर, हरी विठ्ठल नगर ,वाघ नगर परिसर पिंपळा उपनगर अशा तमाम वस्तीला त्याचा उपयोग होईल. पिंपराळा उपनगर परिसरातील लोकसंख्या एक लाख 25 हजार इतकी आहे. आणि सर्व जातीय धर्मा च्या जनतेला याचा फायदा होऊ शकतो. PMJVK मार्गदर्शकानुसार त्या ठिकाणाहून विद्यापीठ महाविद्यालय शाळा जवळ असल्याने त्याचा फायदा विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावचे उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, जमिल देशपांडे, गौतमी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संगिता मालेराव, उपाध्यक्षा सिंधुताई जाधव, सचिव ज्योती निकम, आशा सुरळके, राणी नन्नवरे,वंदना बागर, ऐयाती बाम्हणे, जयक्षी सपकाळे ,जयक्षी जाधव, मिना सोनवणे, निशा सुरवाडे, पुनम जाधव, वैशाली साळुंखे, मंगला सोनवणे, अपर्णा निकम, शारदा अबगड, रेखा अवचारे, आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button