राजकीयजळगाव

‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव शहरातील एक चौकाला द्यावे.- मनसे ची मागणी

जळगाव, दि.20 (जनसंवाद न्युज): शहरात पर्यावरणप्रेमी विचारांची रुजवात व्हावी, शहरातील नागरिकांना निसर्गप्रेमाचे भान निर्माण व्हावे आणि पद्मश्री अरण्यऋषी मा. मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठसा जनमानसावर उमटावा, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्याची अधिकृत मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली.

मा. श्री. चितमपल्ली हे नामवंत पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक, लेखक व पर्यावरण कार्यकर्ते होते. ‘अरण्यऋषी’ ही उपाधी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व पर्यावरणसंवर्धनासाठी आजन्म कार्यरत राहिले. त्यांनी २००९ साली जळगाव शहरात झालेल्या ‘वसुंधरा महोत्सवा’ला आपल्या उपस्थितीने सन्मानित केले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चौक नामकरण हा पर्यावरणप्रेमी शहराची कृतज्ञता दर्शवण्याचा एक भाग आहे.

मागणीचा उद्देश :
जळगाव शहरात पर्यावरणाची जाणीव वाढवणे. नव्या पिढीला प्रेरणा देणारे नाव देणे ‘चितमपल्ली’ यांच्या कार्याचा गौरव करणे आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यावरणप्रेमी आणि संवेदनशील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ही मागणी करत आहे. आणि महानगरपालिकेने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,प्रकाश जोशी, ॲड. सागर शिंपी, किशोर खलसे, ऐश्वर्या श्रीरामे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button