जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

समाजसेवक स्वप्निल चौधरी यांच्या तर्फे 1000 गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

आजोबांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेत असल्याची व्यक्त केली भावना

जळगाव, दि. 10 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील भाजप कार्यकर्ते व समाज सेवेची आवड असलेले स्वप्निल अवधूत चौधरी यांनी 1000 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले. हा कार्यक्रम रविवारी दुपारी चार वाजता गणेशवाडीतील मुक्तांगण सभागृहात संपन्न झाला. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, हाड वैद्य डॉ. अवधूत चौधरी, भाजपा मंडळ 2 च्या अध्यक्षा दीपमाला काळे, भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, समाजसेवक संजय श्रीराम चौधरी (विठोबा भाऊ), समाजसेवक अनिल सोमा चौधरी, प्रकाश शेठ बालाणी, अॅड. सुजित जाधव, समाजसेवक बापू साहेब पाटील, समाजसेविका शोभा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्यां चित्रा मालपाणी, नितीन पाटील सर, शरद मामा चौधरी, आनंदा फकिरा जोशी माजी जिल्हाध्यक्ष तलाठी महासंघ, प्रसाद निशाणदार, सुनील चौधरी, योगेश बागडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्तांगण सभागृह विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे भरून गेले होते. काही लोक बाहेर उभे असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले की स्वप्नील चौधरी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, यांनी गरीब वस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब मुलांना मदतीचा हात दिला आहे. स्वप्निल अवधूत चौधरी म्हणाले की आजोबांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असून गरीब व गरजू लोकांची मदत करण्याचे भाग्य मला मिळाले अशी भावना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button