अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक दोन सख्खे भाऊ जागीच ठार

जळगाव, दि. ४ (जनसंवाद न्युज): निमखेडी रस्त्यावर असलेल्या जुनी लोखंड फॅक्टरी समोर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिली. त्यात दोन भाऊ जागीच ठार झाले. हि घटना आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शिवदे वय 45 वर्ष व प्रमोद शिवदे वय 35 वर्ष अशी मृतांची नावे असून ते सख्खे भाऊ आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला महानगर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती व दिर आहेत. पिंप्राळा येथील मयुर काॅलनीतील रहिवाशी आहेत.
सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश्वर उर्फ छोटू झगडू शिवदे (भोई) व प्रमोद उर्फ पप्पू झगडू शिवदे (भोई) हे दोघ भाऊ फुले मार्केट येथील तळमजल्यावर साई ज्योती चाट भांडार नावाने पाणीपुरीची गाडी चालवतात. आज पहाटे शिवाजीनगर येथे रिक्षाने जात असताना एका अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की एक जण रस्त्याच्या बाजुला असलेल्या रोडरोलर वर पडलेला होता तर एक जण रिक्षात अडकलेला होता. पोलीस घटनास्थळावर दाखल झाल्यावर एम्बुलन्सने मृतांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.
असे घटनास्थळावर माहिती घेतली असता नागरीकांनी सांगीतले. अज्ञात वाहनाने धडक दिल्यावर वाहन जागेवरून फरार झाले. पोलीस त्या अज्ञान वाहनाचा शोध घेत आहेत.