सामाजिक

जखमी सर्पावर यशस्वी शस्त्रक्रिया, पशुवैद्यकांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव, दि.31 (जनसंवाद न्युज): निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एरंडोल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आज एका जखमी दृष्टि सर्पाची (स्पेक्टॅकल्ड कोब्रा) यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

हा सर्प जवळच्या गावात दगडांमध्ये अडकलेला आढळून आला. संघर्षादरम्यान त्याला दोन खोल जखमा झाल्या होत्या. स्थानिक सर्पमित्राने त्याला वाचवून एरंडोल दवाखान्यात आणले.

पशुवैद्यक डॉ. अविनाश रणवीर (VD उत्तरण) यांनी सर्पाच्या जखमांचे निरीक्षण करून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि टाके घातले. या प्रक्रियेत डॉ. प्राप्ती पारखे (VD एरंडोल) आणि डॉ. राहुल साळुंखे (VD पिंपळकोठा) यांनी सहकार्य केले. ऑपरेशननंतर सर्पाला योग्य उपचार आणि निगा देण्यात आली. MVU कर्मचारी आणि दवाखान्यातील ड्रेसर यांनीही या कार्यात मदत केली.

सर्प संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा घटनांमुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील सहजीवन अधिक दृढ होण्यासाठी चालना मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button