जळगावताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. यशस्वी स्पर्धकांना मिळणार रोख पारितोषिक

जळगाव, दि.२८ (जनसंवाद न्युज): गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांसाठी गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात होईल. स्पर्धा संपल्यानंतर तेथेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह यशस्वी शाळांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी दि.३० सप्टेंबर पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सुधीर पाटील (९८२३०६२३३०) किंवा गिरीश कुळकर्णी यांच्याशी (९८२३३३४०८४) संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button