जळगाव
नशिराबाद येथे घराला आग, तीन लाख रुपये किमतीच्या बांधकाम पाट्या जळून खाक

जळगाव, दि. 21(जनसंवाद न्युज): नशिराबाद येथील सुधाकर नांदुरकर यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये नांदुरकर यांचे बांधकामाच्या पाट्या लाकडं जळून खाक झाल्याने तीन लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे नांदुरकर यांनी सांगीतले. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तसेच नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेत आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा इतर घरांना आग लागून मोठे नुकसान झाले असते, आगीचे नेमकं कारण समोर आलेलं नाही.