सांस्कृतिकजळगावराजकीय

धुलिवंदननिमित्त 700 किलो नैसर्गिक रंगाची होणार उधळण, खान्देश सेंट्रल येथे रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन, सर्वांना विनामुल्य प्रवेश

जळगाव, दि.5 (जनसंवाद न्युज): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना तर्फे शुक्रवार, दिनांक 14 मार्च 2025 रोजी जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे धुलिवंदनानिमित्त रंग बरसे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सर्व जळगावकर नागरिकांसाठी खुले राहणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे. यासाठी पुण्याहून 700 किलो पर्यावरणपूर्वक नैसर्गिक रंग मागविण्यात आला असून, या सह मुंबईहून विविध रंगांचे 70 सिलेंडर, कलर स्प्रे, सी.ओ.टु. कनफत्ती ब्लास्ट मशीन, पेपर ब्लास्ट मागविण्यात आले आहे. या सह पारंपरिक वाद्य, फ्लयिंग डॉल्बी साऊंड सिस्टिमवर होळीचे गाणी आदींची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सहकुटुंब सहभागी होणाऱ्या नागरिकांना वेगळी व्यवस्था राहणार आहे.
तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या रंग बरसे कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावे असे आवाहन युवासेना तर्फे प्रितम शिंदे, अजय खैरनार व संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button