
जळगाव, दि.2 (जनसंवाद न्युज): चौकार आणि षटकारांची बरसात आणि प्रत्येक शॉटला मिळालेल्या टाळ्या, शिट्ट्या अशा उदंड उत्साहात जळगावात महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट संघ ठरला उपविजेता ठरला. हम भी कुछ कम नही अशा ईर्षेने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत फायनल मॅच खेळून अवघ्या काही धावसंख्येने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपविजेत्यांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या संघाचे नेतृत्व संघाचे कर्णधार तसेच हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या संचालीका भारती काळे यानी केले. तर जागृती काळे, सुप्रिया पाटील, करिश्मा अहिरे,मोहिनी कोळी, उज्वला कासार, कृष्णाली चांदेलकर, मुन्नी बारेला यासह इतर खेळाडूनी विजय संपादन करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.