शिवधाम मंदिरात महाशिवरात्र निमित्त एक हजार लिटर मिल्कशेक व साबुदाणा खिचडीचे वाटप

जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): बुधवारी महाशिवरात्र निमित्त जळगाव शहरातील महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. निमखेडी रोडवरील शिवधाम मंदिरापासुन आग्रा व दिल्ली येथील कलावंतांसह भोले बाबाची मिरवणूक काढुन कार्यक्रम सादर केला. यश अग्रवाल यांनी शिवधाम मंदिरात दोन तास अखंड पाठ केला, तसेच एक हजार लिटर मिल्कशेक व दाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
जळगाव शहरातील सुप्रसिद्ध असलेले ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव निमित्त संपुर्ण मंदिर परीसर अत्यंत सुशोभीत करण्यात आला होता. पहाटे चार वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले होते. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. ओंकारेश्वर मंदिरात संध्याकाळी सहा वाजता जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते सपत्नीक 108 निरंजन महाआरती करण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.