
जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): २५ फेब्रुवारी हा पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांचा श्रद्धेय दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ भवरलाल जैन हे सामाजिक एकतेचे प्रतीक होते. सर्व समाजाला घेऊन चालणारे व सर्व समाजाच्या सोबत बंधूभाव निर्माण करणारे होते. अशा या व्यक्तीसोबत जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी २७ वर्ष सेवा केली असल्याने त्यांच्या या सामाजिक एकतेला अनुसरून १ मार्च शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या रमजान पर्वासाठी गरजवंत अशा ५० लोकांना रमजान किट चे वाटप जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी तर्फे करण्यात आले.
रमजान किट मधील साहित्य
या रमजान किट मध्ये तेल, साखर, तुरदाळ, मुंग डाळ, उडद डाळ, मठ डाळ ,बेसन पीठ, लाल मिरची, शेंगदाणा, धनिया, चणे चहा पत्ती, सह खजूर , रोट, रूहअब्जा बॉटल असा सुमारे १६०० रुपये चा एक किट ५० गरजवंतांना ८० हजार रुपयांचे किट देण्यात आले.