बुद्धिस्ट क्रिकेट स्पर्धेचा शानदार समारोप, संविधान वॉरियर 358 या टीमने जिंकला अंतिम सामना

जळगाव, दि. 11 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चषक बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व 3 स्पर्धा संपन्न झाल्या. जळगाव जिल्ह्यातून एकूण 16 टीम ने सहभाग नोंदवलेला होता. त्यात जिल्हाभरातून समाज बांधवांनी संघमालकाची जबाबदारी घेतली. सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हा सामाजिक कार्यक्रम अति उत्साहात पार पडला. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात संविधान वॉरियर 358 या टीमने अंतिम सामना जिंकला. त्यांच्या विरोधात पंचशील द पाथ मेकर यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला, त्यासोबतच तिसरं पारितोषिक रमाई सुपर किंग्स यांनी पटकावला आणि चौथा पारितोषिक भीमा कोरेगाव फायटर्स यांनी पटकावले .फेअर प्ले अवॉर्ड भीम वॉरियर्स, मॅन ऑफ द सिरीज संदेश सुरवाडे, बेस्ट बॅट्समन शुभम अहिरे, बेस्ट बॉलर वेदांत शिंदे या सर्व खेळाडूंचं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला, तसेच जयेश मोरे यांना श्री छत्रपती शिवाजी राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व- 3 चे मुख्य प्रायोजक राजेशजी झाल्टे उपस्थित होते, तसेच बॅनर स्पॉन्सर्स प्रफुल बोरकर, मनोहर तायडे, अनिल बैसाणे व बॉलर्स स्पॉन्सर्स आकाश बाविस्कर ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर रोहित मोरे,16 टीमचे संघमालक आशिष सपकाळे, सौ भारती रंधे, अभिजीत रंधे, सतीश गायकवाड? गौरव गायकवाड, त्रुशाल सोनवणे, सुहास पवार, सिद्धांत अहिरे, विशाल अहिरे, राधे शिरसाठ, सुमित तायडे, शिरीष कुमार तायडे, अजय गरुड, शुभम अहिरे, विजय सोनवणे, राजेंद्र भालशंकर, सचिन सपकाळे, विजय निकम, मधुकर सपकाळ, प्रसाद तायडे? ललित बागुल, अमोल जाधव, बॉलिंगचे स्पॉन्सर सतीश मोरे, बॅटिंग एंड स्पॉन्सर्स आशिष इलेक्ट्रिकल्सचे संजयजी इंगळे, ट्रॉफी स्पॉन्सर्स अशितोष मोरे, टॉस का बॉसचे स्पॉन्सर्स दिघेश तायडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विक्रम रंधे, पवन कुमार मेढे, आशिष सपकाळे, दिनेश अहिरे, सतीश गवई, सचिन सरकटे, यश सोनवणे, दिनेश अहिरे, जयेश मोरे, सागर बांगर, दशरथ सपकाळे, शेखर सपकाळे, सचिन सपकाळे, संदीप वारुळे, भगवान भालेराव, प्रवीण वाघ, राजू डोंगरे, अजय हिंदाटे, आनंद अहिरे, श्रावण बाविस्कर, विकी रंधे, विशेष सहकार्य सतीश गायकवाड, विशाल अहिरे, राधे शिरसाट, अजय गरुड, गणेश पगारे तसेच शेकडो समाज बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अतिशय उत्साहात हा पाच दिवसाचा कार्यक्रम संपन्न केला.