जळगावसामाजिक

संविधान गौरव अभियान दरम्यान निबंध व वक्तृत्व स्पर्धा संपन्न, पिंप्राळा परीसरातील पाच शाळांचा सहभाग

जळगाव, दि.1 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 दरम्यान” संविधान गौरव अभियान” राबवण्यात आले. या अभियानाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील पिंप्राळा प्रभागात नवनिर्वाचित आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा शहर कार्यकारिणीच्या समन्वयातून पाच शाळांच्या सक्रिय सहभागातून निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. महाराणा प्रताप विद्यालय प्रेमनगर जळगाव, श्री भगीरथ केशरलाल सोमानी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा, पांडुरंग मुरलीधर मुंदडे हायस्कूल पिंप्राळा, कै. गिरजाबाई नथू शेठ चांदसकर माध्यमिक विद्यालय विद्यानगर पिंप्राळा, ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालय नवीन हायस्कूल पिंप्राळा जळगाव. निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यशस्वी रित्या पीएम मुंदडा हायस्कूल पिंपराळा येथे राबविण्यात आले.


स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी मान्यवर व परीक्षकांसमोर आपले वक्तृत्व सादर केले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला वक्तृत्व स्पर्धेत निवड करण्यात आली तसेच निबंध स्पर्धेत प्रत्येक शाळेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र व भारतीय संविधानाची उद्देशिकाची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे लेखन केलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी त्यांचे परीक्षण करून योग्य प्रकारे मूल्यांकन केले व त्यानुसार क्रमांक एक ते तीन पारितोषिके ठरवण्यात आली. त्यानिमित्त जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाहक जळगाव शहराचे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वला बेंडाळे अनुसूचित जातीचे सरचिटणीस ज्योती निंभोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व संघटक श्री राधेश्याम चौधरी भाजयुमचे सरचिटणीस रोहित सोनवणे समाजसेवक अतुल बारी नगरसेवक सुरेश सोनवणे विजय पाटील भाजपाचे सौ योगिता मालवी मुंदडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डीएस कुमावत सर ग्रामविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पंकज जोगी सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे आशिष सपकाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल पवार सोबत इस्माईल खाटीक, हरी ओम सूर्यवंशी, शिवकुमार पुरोहित, राजू डोंगरे, प्रथमेश जोशी, निलेश परदेशी, कमलेश डांबरे, पवन सपकाळे, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button