
जळगाव, दि. 17 (जनसंवाद न्युज): इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि . 17/01/2025 रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विविध पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इकरा युनानी मेडिकल कॉलेज चे प्राचार्य कारी अब्दुल कुद्दुस, इकरा उर्दू डी.एल.एड. कॉलेज च्या प्राचार्या प्रा. सईदा वकील मॅडम आणि इकरा पब्लिक हायस्कूल चे प्राचार्य श्री. शकील शेख सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इरफान शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश्य विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचनातून चरित्र घडविणे असा आहे हे समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार साहेब यांनी सांगितले की पुस्तक हेच ज्ञानाचे मुख्य स्रोत आहेत व आजच्या युगात पुस्तक हे खूप महत्त्वपूर्ण साधन आहे, हे उदाहरणासह पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.