उद्यापासून लाडवंजारी समाज प्रिमियर लीगला सुरुवात

जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): ८ जानेवारी पासून पाच दिवसीय लाडवंजारी समाजाची भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व-तिसरे मोठ्या उत्सात सुरुवात होणार असून यामध्ये समाज ऐक्याचा संदेश समाजाच्या वतीने दिला जाणार आहे. तसेच क्रीडा स्पर्धेनिमित्त समाज भावना एक व्हावी, सर्वांचे एकत्रीकरण व्हावे, खेळाडू यांना प्रोत्साहन मिळावे,खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदीर संस्थानच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
समाजातील उद्योजक,व्यवसाहीक,सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांनी संघ प्रायोजकत्व स्विकारले.त्यामधे नमस्कार फूड,माऊली सेल्स,मुकेश टेंट,युवा उद्योजक, श्रीराम पॉलिमर्स, क्षितीज फाऊंडेशन, आर.एल.स्पोर्ट्स, जि.डी.ब्रदर्स सचिन सानप फाऊंडेशन, तुळजाई फाऊंडेशन, जे.जे.किंग,दत्तनगर सूपर किंग,चिमुकले गणराय कट्टा, यासंघांनी सहभाग घेतला आहे. प्रतिवर्षी समाजाच्या क्रीडा स्पर्धेमुळे १६ ते १८ लाख रुपयांचा व्यवहार हा शहरामधे होत असतो. समाजाचे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू हे सहभागी होतात.
श्रीराम मंदिर संस्थान अध्यक्ष व आयोजन समिती प्रमुख चंद्रकांत लाड, सचिन लाडवंजारी, स्वप्निल वंजारी,नितीन पाटील व सर्व संस्था संचालक मंडळ,समितीच्या वतीने सर्व क्रीडा प्रेमी, प्रेक्षक, समाज बांधव यांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.