
जळगाव, दि. 3 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे नवीन वर्षानिमित्त 1जानेवारी 2025 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार यात पाणीपुरी, भेळ, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. प्रसंगी मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक सर समवेत सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.