जळगावताज्या बातम्यासामाजिक

मनसे तर्फे महिलांसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना

जळगाव, दि. 3 (जनसंवाद न्युज): महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महिलांसाठी विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्हा स्तरावर मदत कक्ष:
मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांच्या ४ मुळे कॉम्प्लेक्स, आरटीओ कार्यालया,समोर, गणपती नगर, जळगाव येथील कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या विविध तक्रारी व समस्यांसाठी हा कक्ष कार्यरत असेल. प्रशासनिक स्तरावर या तक्रारींचे निराकरण करून महिलांना न्याय देण्याचा मनसेचा कटिबद्ध प्रयत्न असेल.

महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कक्ष खुले राहील. या कालावधीत येणाऱ्या सर्व तक्रारींवर योग्य तो पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.

तक्रारींचा प्रकार: कौटुंबिक हिंसाचार,छळवणूक,सामाजिक अन्याय, कायदेशीर मार्गदर्शन,इतर प्रशासकीय समस्या.

मनसेचा पुढाकार:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांच्या हक्कांसाठी ठाम पावले उचलत या कक्षाद्वारे तक्रारींना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मनसेने या उपक्रमाद्वारे सामाजिक बदल घडवण्याचा संकल्प केला आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी १ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात महिला मदत कक्ष सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने महिला मदत कक्ष सुरू करण्यात येत आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button