पाळधी येथील साई मंदिरात संगीतमय सुंदरकांड संपन्न, आज इंडियन ऑयडाॅल फेम श्रीमान नितीन कुमार यांचा भजन संध्या कार्यक्रम

जळगाव, दि.25 (जनसंवाद न्युज): पाळधी येथील साई मंदिरात मंगळवारी सुंदरकांडने ब्रम्होत्सवाला सुरूवात झाली. हनुमानाचे भगवान श्रीरामाप्रती असलेल्या आस्थेचे सुंदर वर्णन करत प.पु. सुश्री अल्काश्रीजी यांनी संगीतमय सुंदरकांड द्वारे ब्रम्होत्सवाचे पहिले पुष्प गुंफले. संगीतमय सुंदरकांड सुरू असताना उपस्थित महिलांनी मंचासमोर संगीतमय सुंदरकांडच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला.
शहरासह पाळधी गावातुन भक्तांची गर्दी
जळगाव शहरासह पाळधी गावातुन नागरिकांनी ब्रम्होत्सवाला भेट देऊन प.पु. सुश्री अल्काश्रीजी यांच्या मुखातून सादर झालेल्या संगीतमय सुंदरकांडचा आनंद घेतला. मंत्री मा.ना. गुलाबराव पाटील व गिरीष महाजन यांनी ब्रम्होत्सवाला भेट देऊन साईंचे दर्शन घेत बराच वेळ कार्यक्रमाला उपस्थिती दिली. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. मंदिरावर संपुर्ण रोषणाई करण्यात आली असुन मंदिर परीसरात जत्रा भरली आहे.
आज भजन संध्या
आज संध्याकाळी सहा वाजता इंडियन ऑयडाॅल फेम श्रीमान नितीन कुमार यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे, तर उद्या गुरुवारी दि. 26 रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक होईल. दुपारी चारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे असून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे नीतीन लढ्ढा, सुनिल झवर, राजु दोशी, सुरज झवर, यांनी केले आहे.