पाळधी येथील साई मंदिरात आज सुंदरकांड, ब्रम्होत्सवाला आज पासुन सुरूवात

जळगाव, दि. 24 (जनसंवाद न्युज): पाळधी येथे प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माता मंदिर आहे. या देवस्थानाचा यंदा २२ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तीन दिवसीय “ब्रह्मोत्सव”ला आज मंगळवारपासून सुरवात होत आहे. सायंकाळी सहाला संगीतमय सुंदरकांड सुरू होईल. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रती असलेली आस्था याचे सुरेख वर्णन करीत प. पु. सुश्री अल्काश्रीजी या संगीतमय सुंदरकांड सादर करतील. इंडियन आयडॉल फेम नितीन कुमार हे बुधवारी दि. 25 रोजी सायंकाळी सहाला ‘भजन संध्या’ सादर करतील. महोत्सवात तीन दिवस नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजाअर्चा करणार आहेत. श्री साईबाबा, परमभक्त हनुमान, गायल माताजी यांचा गुरुवारी दि 26 रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक होईल. दुपारी चारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी तीनही दिवस मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, मधुकर झंवर, रामचंद्र झंवर, किरण झंवर, प्रवीण झंवर, सुरज (लाला) झंवर, चंद्रकांत इंदाणी, राजेंद्र इंदाणी, शरदचंद्र कासट, नितीन लढा, मनीष झंवर, राजेश दोशी, राजेश तोतला, पक ठक्कर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र (पप्पू) चौधरी, नरेश दोशी, सतीश अग्रवाल, कैलास मालू आदींनी केले आहे.