प्रभाकर कला अकादमीतर्फे सतरंगी रे नृत्याविष्कार संपन्न

जळगाव, दि.8 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील प्रभाकर कला संगीत अकादमीच्या विद्यार्थिनींनी सतरंगी रे या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नृत्याविष्कार घडविला. भैय्यासाहेब गंधे सभागृहात रविवारी संध्याकाळी प्रभाकर कला संगीत अकादमी प्रस्तुत या कार्यक्रमाचे रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ॲड. केतन ढाके, अकादमीच्या संचालिका डॉ.अपर्णा भट, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष दिनेश थोरात, सांस्कृतिक समिती प्रमुख संदीप मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गणेश, सरस्वती व गुरुवंदना सादर करण्यात आली. नमो नमो हे शंकराला वंदन करणारे आणि टाळ बोले चिपळीला या अभंगावर नृत्य सादर करण्यात आले. गणेश स्तुती व नंतर नववधूची भावना व्यक्त करणाऱ्या मैने पायल है झंकाई ह्या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
कृष्णाचा शोध घेणाऱ्या राधा धुंड रही तर झूम झूम पायी वाजे घुंगुर या गीतांचे सादरीकरण झाले. कथक आणि कृष्ण अनोखे नाते आहे म्हणून कान्हा रे हा तराना आणि पावसातील विविध भावभावना व्यक्त करणारे ढग दाटून येतात या गीतांवर विद्यार्थिनींनी कथक सादर केले.
श्रेया घोषाल यांच्या आवाजातील मधुराष्टकम अर्थात भगवान श्रीकृष्णांचे आठ श्लोकांच्या माध्यमातून केलेल्या वर्णनावर नृत्य प्रस्तुत करण्यात आले.
कैलास खेर यांच्या तेरी दिवानी आणि महेश काळे यांनी यमन रागावर आधारित गायलेल्या तराण्यावर पारंपारिक व आधुनिक असे फ्युजन शेवटी सादर करण्यात आले.
कार्यक्रमात अकादमीच्या सानवी जाखेटे, लारण्या चौधरी, आरोही मोरे, स्वरा पाटील, निष्का मुंदडा, हितेशी लुंकड, निधी सुर्वे, एकता जोगी, प्रेक्षा बनवट, श्रावणी बोरसे, नित्या वाठ, कल्याणी भामरे, भार्गवी खैरनार, स्वधा भामरे, प्रवजा जाधव, युक्ता मोरदे, ऋत्विका शिरसाळे, अनन्या कोष्टी, स्मरणिका देवळे, जीविका पाटील, अनुष्का कासार, विधी झोपे, जुनिशा जेठवाणी, यज्ञा मोरे, त्रिवेणी घारगे, आनंदी याज्ञिक, समृद्धी पाटील, संस्कृती गवळे, स्वानंदी बोरसे, तेजस्विनी क्षीरसागर, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, डॉ. रिद्धी जैन यांचा सहभाग होता. पालकांच्या वतीने सायली वाठ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन साधना दामले यांनी तर कार्यक्रमाचे निवेदन अकादमीच्या विद्यार्थिनींनी केले. आभार समृद्धी पाटील या विद्यार्थिनींनी मानले.6