
जळगाव, दि. 7 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक होते. तर प्रमुख अतिथी स्वाती नाईक, शितल कोळी हे होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती सांगितली विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. रूपाली आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वला नन्नवरे यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी रुंद यांनी परिश्रम घेतले.