पाळधी येथील साई मंदिरात भजन संध्या कार्यक्रम संपन्न, आज महाप्रसाद

जळगाव, दि.26 (जनसंवाद न्युज): पाळधी येथील साई मंदिरात मंगळवारी सुंदरकांडने ब्रम्होत्सवाला सुरूवात झाली. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता इंडियन ऑयडाॅल फेम श्रीमान नितीन कुमार यांचा भजन संध्या कार्यक्रम पार पडला. श्रीमान नितीन कुमार यांनी आपल्या मधुर वाणीतून सादर केलेल्या भक्तीगीतात सर्व भक्तगण न्हाऊन निघाले. दुसर्या दिवशी सुध्दा पाळधी गावातील नागरिक व जळगाव शहरातील नागरीकांसह मान्यवरांनी भजन संध्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन आनंद घेतला.
साईबाबांच्या मुर्तीला पांढर्या शुभ्र वस्राने व फुलांनी सजवण्यात आले होते. दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक गेट तयार करण्यात आले असुन मंदिराच्या मार्गावर व परीसरात रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परीसरात जत्रा भरली असुन वस्तु खरेदीसाठी नवनविन दुकाने थाटली आहेत.
आज महाप्रसाद
आज सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक होईल. नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मंत्रोच्चारात महाआरती व पूजाअर्चा करणार आहेत. दुपारी चारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे नीतीन लढ्ढा, सुनिल झवर, राजु दोशी, सुरज झवर, यांनी केले आहे.