जळगावशैक्षणिक

एसडी-सीड तर्फे २४ नोव्हेंबर रोजी शिष्यवृत्ती वितरण

मा. डॉ. एस. एस. मंथा आणि भूमिपुत्र मा. दीपक चौधरी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव, दि.21 (जनसंवाद न्युज): भारतातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजची सर्वोच्च संस्था AICTE चे माजी अध्यक्ष व रामदेव बाबा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डाॅ. एस.एस. मंथा आणि यशस्वी उद्योजक स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूमिपुत्र मा. दीपक चौधरी याच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण २४ नोव्हेंबर २०२४, रविवार सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य गृह, जळगाव येथे होणार आहे.

तंत्र शिक्षण विद्यार्थी केंद्रीत करून ते जागतिक दर्जाचे करताना संबंधित संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्व अधोरेखित करत अखिल भारतीय तंत्र शिक्षा परिषद नयी दिल्लीच्या कार्यपद्धतीत मुलभूत घडविणारे प्रख्यात शिक्षणतज्ञ डाॅ. एस. एस. मंथा हे तरूणांना तंत्र शिक्षणाकडे कसे जाता येईल व जागतिक स्पर्धेत स्वतःला कसे सिद्ध करता येईल व गुराख्याचा मुलगा ते जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर इंजिनिअर बनून २७०० कोटींची उलाढाल करणारा यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविणारे भूमिपुत्र मा. दीपक चौधरी है उद्योग क्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यासाठी आपल्या अमोघ वक्तृत्वातुन उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी, अद्भुत आणि करिअरला नवीन दिशा देण्याचा जीवन प्रवासाचा पट त्याच्या मार्गदर्शनातून उलगडणार आहे. हे मार्गदर्शन मुले व तरुणासोबतच मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचे ठरणार आहे.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय

डॉ. एस. एस. मंथा

डॉ एस एस मंथा, एक प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि सक्षम प्रशासक असून ते ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) चे माजी अध्यक्ष आहेत. प्रशासनात्तील पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी त्यानी अमुलाग्र बदल घडविले

त्यांनी बडोदा येथील एम एस युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे आणि व्हीजेटीआय, मुंबई वेधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. प्राध्यापक म्हणून व्हीजेटीआयमध्ये 6 वर्षे काम केले त्यानतर एमएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ही होते.

मा. दीपक चौधरी

श्री दीपक चौधरी हे स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रतिष्ठित संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. श्री चौधरी यानी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. व्यावसायिक प्रवासः

स्वकल्पना, सुशासन आणि गुणवत्तेसाठी बचनबद्धतेने प्रवासाला सुरुवात करताना, श्री चौधरी यानी 1994 मध्ये स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्सला एक वेगळ्या उचीवर पोहचविले आहे काही वर्षापूर्वी कंपनीने भाग भांडवली बाजारातही पदार्पण केले आहे संस्थात्मक यशः

श्री चौधरी याच्या नेतृत्वात स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्सने 1994 मध्ये नोकरीच्या दुकानाच्या सुरुवातीपासून ते एक मजबूत व्यावसायिक उपक्रम म्हणून सातत्याने प्रगती केली आहे. कंपनीने आपल्या तांत्रिक पदचिन्हाचा विस्तार केला आहे, नवीन क्षेत्रामध्ये विविधता आणली आहे आणि स्वतंत्र व्यवसायांना एकसंध घटकामध्ये यशस्वीरित्या एकत्रित केले आहे. श्री चौधरी यांनी कपनीला NSE इमर्ज लॅटफॉर्मवर सूचीत आणले आणि नेक्सट जेन तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवसाय पद्धतीमध्ये बेंचमार्किंग तैनात केले. सकाळ पेपर्सतर्फे त्यांना सकाळ एक्सलन्स अवॉर्ड आणि सेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्वरतर्फे उद्योग आणि समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल माईलस्टोन अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे

तरी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी संबधित शिक्षणप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सी रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा श्रीमती मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुनार रेदासनी आणि संचालक मंडळ, मार्गदशन समिती व सर्व तालुका समन्वयक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button