जळगावताज्या बातम्या

सोशल मिडीया,इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा प्रचारही 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार बंद

जळगाव, दि.11 (जनसंवाद न्युज ): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 पासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडीया,इलेक्ट्रॉनिक मीडियारूनही जाहिराती, प्रचार करता येणार नाही. यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून कोणीही निवडणूक आयोगाचा नियमाचा भंग करु नये. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

वर्तमानपत्रात पूर्वप्रामाणिकरण करून जाहिरात देता येणार
वर्तमानपत्रात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे.  मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापुर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना निवडणुक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका, २०२४ मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर आणि मतदानाच्या एक दिवस आधी १९ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रात द्यायची जाहिरात जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत वर्तमानपत्रात राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी MCMC समितीकडे अर्ज करावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button