जळगावताज्या बातम्यासमाजकारण

धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने लाक्षणिक उपोषण तसेच एक तास मौन आंदोलन

जळगाव, दि. 2 (जनसंवाद न्युज): धनगर समाजाच्या प्रलंबित मांगण्यासाठी 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने शिवतीर्थ मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तसेच एक तास मौन आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतुन एस टी आरक्षण आतापर्यत लागू केल गेले नसल्याने गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय दुर करून अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, या प्रमुख मांगणीसह विविध मांगण्यासाठी धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तसेच एक तास मौन आंदोलन करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

नवरात्रोत्सव, आजचा रंग हिरवा

या आहेत मांगण्या

1) शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील धनगर समाजातील अधिकारी कर्मचारी हे पदोन्नती पासून वंचित असून मे न्यायालयाच्या अधीन राहून त्वरित पदोन्नतीचे बढतीचे आदेश काढावे.
2) जळगाव जिल्हायची माहिती देताना जिल्हाच्या ऐतिहासिक माहितीत गुगल पेजवर होळकरांचा नामोल्लेख हटवला गेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सदर प्रदेश हा होळकरांच्या आधीपत्याखाली होता असा उल्लेख करण्यात यावा.
3) धनगर समाज्याविषयीं शासनाने वेळोवेळी ज्या घोषणा केल्या आहेत त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी तात्काळ करावी.
5) खानदेशातील होळकर कालीन पाय बारवा, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, त्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा, प्रगतीच्या नावाखाली होळकर कालीन पायबारवा बुजविण्यात येत असून त्यांना संरक्षण मिळावे.
6) राज्यातील अनेक कंपन्या व संस्था यांना लाखो हेक्टर जमिनी शासनाने लीजवर दिली आहे त्या जमिनीवर मेंढर चारण्याची मुभा मेंढपाळांना द्यावी.
7) मेन फळांच्या मुलांसाठी फिरत्या शाळा सुरू करावे.
8) मेंढपाळांच्या पशुधनासाठी व त्यांच्या करिता फिरते दवाखाने सुरू करावे.
9) शहरातील व खेड्यातील धनगर बेरोजगारांच्या व्यवसायासाठी पाच लाखापर्यंत कर्ज विनाअट मंजूर करावी.
10) महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या कर्जाच्या फायली समाजकल्याण विभागातून पास होऊन बँकेत अडकून ठेवल्या जातात. त्यासाठी शासनाने बँकांना कडक निर्देश द्यावे.
11) शहरातील मध्यवर्ती भाग इच्छादेवी चौक या ठिकाणाला अहिल्यादेवी होळकर चौकशी नामकरण करावे.
12) मेंढपाळांसाठी राखीव जंगल उपलब्ध करून द्यावे
अश्या विविध मांगण्यासाठी धनगर युवक क्रांती दलाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष वीरूदेव व्हडंगर, जिल्हाध्यक्ष भुरा पवार, रामदास चोरमले, गुलाब मोरे, प्रकाश पाटील, सावकार मोटे, राजू महाजन, खेमा पांढरे, समाधान बोरकर, श्रावण कोळेकर, शिवाजी हटकर, गजानन देशमुख, कैलास सोनवणे, अनिल शिरूडे, मयूर धनगर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button