जळगावताज्या बातम्या

बोधगया महाविहार मुक्तीसाठी बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव, दि.३ (जनसंवाद न्युज): बिहार राज्यातील बोधगया महाविहार या ठिकाणी महात्मा गौतम बुध्दांना संबोधी प्राप्त झाली. त्या पवित्र स्थानावर ब्राम्हणांनी कब्जा केलेला आहे. ते पवित्र स्थान बौध्दांचे आहे. ते बौध्दांना मिळावे यासाठी संपुर्ण भारतात बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क नवी दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार या संघटनेमार्फत संपुर्ण भारतात याविषयी ५ टप्प्यात आंदोलन घोषित केले आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्या नुसार मुकेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

चरणबध्द आंदोलनाचे मुद्दे
१) महाबोधी टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करुन नवी कायदा बनवावा.
२)१८९५ साली अनागरिक धर्मपाल यांच्या बाजुने कोर्टाचा निकाल लागुनही या बौध्दांच्या पवित्र विरासतीवर ब्राम्हणांचा कब्जा हटविण्यात यावा. व बौध्दांच्या हवाली हे पवित्र स्थळ देण्यात यावे.
३)ईव्हीएम मशिनद्वारे केवळ बौध्दांचेच मत प्रभावशुन्य झालेले नाही तर सर्व भारतीय नागरिकांचा मिळालेला मताचा आधिकार प्रभावशुन्य झाला आहे. म्हणुन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात. या व इतर प्रमुख मागण्यांसाठी बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क मार्फत आंदोलन करण्यात आले.

भंते संघरत्नजी थेर यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी सुमित्र अहिरे, नितीन गाढे, देवानंद निकम, राजु खरे, सुनिल देहडे, अनिल पेंढारकर, खुशाल सोनवणे, मनोज वानखेडे, चंद्रशेखर अहिरराव, रविंद्र बाविस्कर, रविंद्र निकम, आर.बी.परदेशी, कुंदन तायडे, राहुल सोनवणे, डॉ.शाकीर शेख, नितीनमोरे, आर.पी.गायकवाड, जयेश खरात, दिलीप तासखेडकर, मनोज तायडे, अशोक सैंदाणे, दिनकर जाधव, समाधान जाधव, अविनाश वानखेडे, नितीन अहिरे, डी.एम.अडकमोल, अक्षय तायडे, जयेश सोनवणे, जगन्नाथ नन्नवरे, रोहित सोनवणे, मुकेश नेतकर, छाया पवार, अनिता पेंढारकर, माया निकम, शितल सोनवणे, संध्या कोचुरे, संगिता देहडे, सुनिता पवार, मेघा पवार, चंद्रकला पेंढारकर आदी उपस्थित होते.

दुसरा टप्पा- धरणे आंदोलन
८ मार्च २०२५ रोजी संपुर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क मार्फत करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button