
जळगाव, दि. 11 (जनसंवाद न्युज): गुरूवारी महाराष्ट्र शासनाने समस्त शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घोषित केली त्याचे औचित्य साधून आज जळगाव येथे अ. भा. क्षत्रिय नामदेव महासंघ हितवर्धक संस्था जळगाव व शहरातील सर्व सहयोगी संस्थेच्या वतीने आज सकाळी १० वाजता शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृह येथे जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी केले व फटाक्याची लड फोडून आतिषबाजी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली व समाज बांधवांना पेढे भरून वाटप केले व संत नामदेव महाराजांचा जय घोषा करण्यात आला तसेच सबका साथ सबका विकास हाच महाराष्ट्र शासनाचा विकास अश्या घोषणा दिल्या आभार व अभिनंदन केले अ भा क्षत्रिय या प्रसगि अ भा क्षत्रिय नामदेव महासंघाचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी सांगितले की सन २००९ पासून म्हणजे गेल्या १५ वर्षापासून संत नामदेव महाराज बहुउदेशिय संस्था व ईतर संस्थेच्या माध्यमातून शासनाला सतत निवेदन दिले जात होते त्याचेच हे फळ मिळाले असून या साठी समाजाचे खंबीर नेतृत्व अ. भा. क्षत्रिय नामदेव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड महेश ढवळे साहेब यांचे खुप मोठे योगदान असून त्यांनी सतत मंत्रालयात जाऊन या साठी खुप प्रयत्न केले असून त्याचेही अभिनंदन केले नुकतिच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन यांची जामनेर येथे भेट घेऊन त्यांना सुद्धा महामंडळ लवकर घोषीत करावे या विषयी जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने ना गिरीश भाऊंनी शिष्टमंडळास ठोस आश्वासन दिले होते की येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमचे सुद्धा महामंडळ घोषित होईल आणि ते घोषित झाले त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, अजित दादा पवार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाब राव पाटील ना गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आ राजू मामा भोळे व राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्री महोदय आमदारांचे या ठिकाणी संघटनेच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी समाजध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे राज्य महिला संघटक सौ कुसुमताई बिरारी सौ सविता बोरसे सुरेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी संस्था पदाधिकारी अनिल खैरनार चेतन खैरनार शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी,शरदराव बिरारी अशोक सोनवणे सतिष जगताप दत्तात्रय वारूळे किरण सोनवणे गणेश सोनवणे भुषण सोनवणे विकास जगताप, ऋषिकेश शिंपी दत्तात्रय कापुरे शैलेंद्र सोनवणे चेतन नेरपगार केतन मेटकर निलेश जगताप शरद कापुरे उमेश शिंपी राहुल शिंपी प्रमोद निकुंभ दिनेश खैरनार विक्की जगताप बापू खैरनार या सह असंख्य समाज बांधव व कार्यकर्त्य मोठ्या संख्येसह उपस्थित होते.