जळगावताज्या बातम्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा उद्या प्रचाराचा शुभारंभ
तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथे प्रचाराचा नारळ वाढवून करणार शुभारंभ

जळगाव, दि. 4 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथून सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. सदर प्रचार रॅली प्रभाग क्रमांक सहा मध्ये शाहू नगर, जेडीसीसी बँक कॉलनी, पोलीस ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट, पोलीस मुख्यालय गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या ठिकाणी फिरणार आहे.
तसेच दुपारी तीन ते सातच्या दरम्यान गोलाणी मार्केट, फुले मार्केट येथे प्रचार रॅली होणार आहे.