संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन भोजन सहलीचा घेतला आनंद

जळगाव, दि.26 (जनसंवाद न्युज): नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणास महत्त्व देण्यात आले आहे. बंद वर्गखोल्यांमधील शिक्षण आणि घोकंपट्टी यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान व निरिक्षणातून विविध घटकांची ओळख व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण मधील शिक्षकांनी मेहरूण तलाव परिसरात वनभोजन सहल चे आयोजन केले. वनभोजन सहल मध्ये मेहरूण तलाव परिसरातील चिमणी घर, तलाव, बेलेश्वर महादेव मंदिर दाखवण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बेलेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भोजनाचा आनंद लुटला.
शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये वर्षामध्ये एकदा वनभोजन आयोजित करीत असतो. त्यामुळे निसर्गाची ओळख विद्यार्थ्यांना होते. असे प्रतिपादन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले.