जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव, दि. 5 (जनसंवाद न्युज): जळगाव जिल्हा पत्रकार संघा तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सकाळी ११ : ०० वाजता मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. दर्पणकार आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण ही मराठी पहिली नियतकालीका सुरु केली. या निमित्ताने जिल्हातील सर्व पत्रकाराना विनंती करण्यात येते कि, या दिवशी महनीय वक्ते म्हणून डा. गणेश मुळे संचालक माहिती व जनसंपर्क नागपूर लाभले आहेत. कार्यक्रम विश्वत मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील याच्या अध्यक्षेत खाली होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार श्री. राजूमामा भोळे पारोळा एरोडोल मतदार संघाचे आमदार श्री. दादासाहेब अमोल पाटील, श्री. निलेश मदाणे जनसंपर्क अधिकारी सचिवालय मुंबई श्री. रजनीकांत कोठारी के.के.उद्योग श्री. ज्ञानदेव पाटील विजयलक्ष्मी पतपेढी असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचे माजी सर्व अध्यक्ष व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा गौरव मान्यवराचे हस्ते करण्यात येणार आहे या सोबतच दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेला सर्व साधारण सभा घेण्यात येणार आहे पत्रकार दिना निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हातील सर्व पत्रकार बाधवानी उपस्थिती द्यावी. अशी विनंती जिल्हा पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.