
जळगाव , दि. 28 (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी मनसे सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ते म्हणाले की राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने बारा वर्षे सक्रिय कार्य करीत राहिलो या प्रवासात मला सर्व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक प्रेम व सहकार्य केले.
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशजी महाजन विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांच्या नेतृत्वात राज्याच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच राज्याचे सध्याच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, सर्व कार्यकर्त्यांनी मिळून असा निर्णय घेतला की जळगाव शहराच्या विकासासाठी विद्यमान आमदार राजू-मामा भोळे यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी भाजपा कडूनच पक्षांतर्गत मदत करण्याचा निर्धार केला व पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
यांनी केला भाजपात प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे , सहसचिव खुशाल ठाकूर, दीपक राठोड, निलेश परदेशी शहर संघटक वाहतूक सेना, पवन सपकाळे विभाग अध्यक्ष, आशुतोष जाधव, हरिओम सूर्यवंशी प्रसिद्धीप्रमुख, इस्माईल खाटीक जळगाव चिटणीस वाहतूक सेना, राजू डोंगरे, विशाल पवार, वासुदेव पाटील, दीपक तायडे विभाग अध्यक्ष, संतोष वाणी, नितीन सैनी, कमलेश डांबरे, संजय वरयानी. प्रणव चव्हाण मग अध्यक्ष निलेश वाणी विभाग अध्यक्ष दीपक राठोड विभागाध्यक्ष पवन सपकाळे विभाग अध्यक्ष साजन पाटील तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.